जकात नाक्यावरील बॅरिकेट हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जकात नाक्यावरील बॅरिकेट हटवले
जकात नाक्यावरील बॅरिकेट हटवले

जकात नाक्यावरील बॅरिकेट हटवले

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तलासरी येथील दापचारी तपासणी नाक्यावर सिमेंटचे बॅरिकेड बसवण्यात आले आहे. यामुळे या भागात अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हे बॅरिकेट हटवावे, या मागणीसाठी माकपतर्फे दापचारी तपासणी नाक्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी जेसीबीच्या मदतीने हे बॅरिकेड हटवले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याचा निषेध व्यक्त करत आमदार विनोद निकोले यांनी सिमेंटचे बेरिकेड हटवून मार्ग खुला केला. या वेळी निकोले म्हणाले की, दापचारी तपासणी नाक्यावर बेकायदा लावलेले सिमेंट बेरिकेड त्वरित हटवा, तपासणी नाक्यावर होणारा आरटीओचा भ्रष्टाचार त्वरित बंद झालाच पाहिजे, आरटीओ पासिंग कार्यालय तलासरी स्थानिक विभागातच पाहिजे, स्थानिक वाहनचालकांना पासची सुविधा मिळालीच पाहिजे, तसेच कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर हजर करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार विनोद निकोले, किसान सभा राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, माकप जिल्हा सचिव किरण गहला, तालुका सचिव लक्ष्मण डोंभरे, तलासरी उपसभापती नंदू हाडळ, तलासरी नगराध्यक्ष सुरेश भोये, सुरेश जाधव, धनेश अक्रे, विजय वाघात, चालक मालक संघटना रतन भोसले, यश कंपनी युनियन पदाधिकारी सतीश मुल्लासरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.