Fri, June 9, 2023

श्री रेणुका शुगर्सचे उत्पन्न वाढले
श्री रेणुका शुगर्सचे उत्पन्न वाढले
Published on : 14 February 2023, 2:50 am
मुंबई, ता. १४ ः साखर व स्वच्छ उर्जा उत्पादक कंपनी श्री रेणुका शुगर्सचे या डिसेंबर २०२२ अखेरीस संपलेल्या नऊ महिन्यांमधील उत्पन्न व निर्यात चांगलीच वाढली आहे. या नऊ महिन्यांमध्ये त्यांना साडेसहा हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. या आधीच्या वर्षाच्या याच नऊ महिन्यांच्या तुलनेत (चार हजार २०५ कोटी रु.) ते ५७ टक्के जास्त होते.
कंपनीची या नऊ महिन्यांमधील निर्यातही ४४ टक्के वाढली. याच कालावधीत त्यांची इथेनॉलची विक्रीही ३३ टक्के वाढली. त्यांच्या डिस्टीलरीतही या नऊ महिन्यांमध्ये बारा कोटी लीटर उत्पादन झाले. जे आधीच्या वर्षाच्या नऊ महिन्यांपेक्षा पन्नास टक्के जास्त होते. तर त्यांचा या नऊमाहीतील तोटाही आधीच्या नऊमाहीपेक्षा २९ टक्क्यांनी घटला.