
जिल्हा परिषदेमार्फत ‘सायक्लोथॉन’
पालघर, ता. १४ (बातमीदार) केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीअंतर्गत मंगळवारी (ता. १४) जिल्हा परिषद पालघर येथे ‘सायक्लोथॉन- सायकल फॉर हेल्थ’ आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक महिन्याच्या १४ तारखेला आरोग्याच्या विविध संकल्पेवर आधारित मेळावे आयोजित केले जातात. या महिन्याची संकल्पना स्वस्थ मन स्वस्थ घर’ असून त्या अनुषंगाने आरोग्यासाठी सायकल चालवणे हे गरजेचे असून सायकलचे महत्त्व कळावे व जनजागृती व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर सायक्लोथॉन’ आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी हिरवे झेंडे दाखवून तसेच प्रत्यक्षात सायकल चालवून आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश दिला. शाळेमधील विद्यार्थीदेखील या उपक्रमात सहभागी झाले होते. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रांजली पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.