खैराची वाहतूक करणारा ट्रक जप्त

खैराची वाहतूक करणारा ट्रक जप्त

मनोर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव तर्फे मनोर येथे रॉयल इन हॉटेलच्या आवारात खैराच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक एस मधूमिथा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान जप्त केलेल्या खैर लाकडाच्या साठ्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याची महिला समोर येत आहे. यावेळी कारवाई दरम्यान एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी पसार झाला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर खैर तस्करी केली जात असल्याची माहिती डहाणूच्या उपवन संरक्षक एस मधुमिथा यांना मिळाली होती. याआधारे मनोर वनपरिक्षेत्र अधिकारी केळुस्कर आणि वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी महामार्गावरील नांदगाव तर्फे मनोरच्या हद्दीत सापळा रचला होता. तेव्हा सुमारास महामार्गावरील रॉयल इन हॉटेलच्या आवारात उभा असलेल्या संशयित टेम्पो आढळून आला. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात खैराच्या लाकडाचा साठा आढळून आल्याने टेम्पो वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com