Mon, March 27, 2023

जोगेश्वरीत नोकराच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू
जोगेश्वरीत नोकराच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू
Published on : 14 February 2023, 4:03 am
मुंबई, ता. १४ : मुंबईतील जोगेश्वरी भागात एका वृद्ध दाम्पत्यावर घरातील नोकराने चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. १३) घडली. या प्राणघातक हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी सुप्रिया चिपळूणकर (६५) या जखमी झाली असून त्यांच्यावर सांताक्रूझ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुधीर चिपळूणकर (७२) असे मृत मालकाचे नाव आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी पप्पू गवळी याला दादर येथून अटक केली आहे. नोकराने कोणत्या कारणासाठी हे पाऊल उचलले, याबाबत पोलिस तपास करत आहेत; परंतु प्राथमिक माहितीनुसार नोकर घरातून सोन्याचे दागिने आणि पैसे लुटण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पप्पू गवळीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.