ज्येष्ठ अभिनेते जावेद खान यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ अभिनेते जावेद खान यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते जावेद खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते जावेद खान यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे प्रदीर्घ आजाराने आज (ता. १४) निधन झाले. श्वसनाच्या त्रासामुळे गेल्या वर्षभरापासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती. सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जावेद खान अमरोही यांनी बॉलीवूडमध्ये सहाय्यक भूमिकांसोबतच कॅमिओदेखील केले. जवळपास १५० हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली. जावेद यांनी ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटात पोलिस हवालदाराची भूमिका करून प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. ‘लगान’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी नामांकन मिळवले होते. याशिवाय ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे ​​इंडिया’तील अभिनयाचेही बरेच कौतुक झाले होते. त्यांनी ‘मिर्झा गालिब’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते. ‘झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्स’मध्ये ते प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.