Fri, June 9, 2023

वरळीत ४२ व्या मजल्यावरून
वीट पडल्याने दोघांचा मृत्यू
वरळीत ४२ व्या मजल्यावरून वीट पडल्याने दोघांचा मृत्यू
Published on : 14 February 2023, 5:36 am
मुंबई, ता. १४ : निर्माणाधीन इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मोठ्या आकाराची वीट पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१४) रात्री वरळी परिसरात घडली. इम्रान आणि शब्बीर अशी मृतांची नावे असून ते एका एक्स्पोर्ट कंपनीत कामाला होते.
वरळी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक ४२ व्या मजल्यावरून मोठ्या आकाराची वीट खाली कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तसेच खाली उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवले. इमारतीचे बांधकाम सुरू असताना सुरक्षा उपाययोजना करण्यात आली होती का, याचा तपास पोलिस करीत आहे.