वरळीत ४२ व्या मजल्यावरून वीट पडल्याने दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीत ४२ व्या मजल्यावरून
वीट पडल्याने दोघांचा मृत्यू
वरळीत ४२ व्या मजल्यावरून वीट पडल्याने दोघांचा मृत्यू

वरळीत ४२ व्या मजल्यावरून वीट पडल्याने दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : निर्माणाधीन इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मोठ्या आकाराची वीट पडल्याने रस्त्याने जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१४) रात्री वरळीच्या गांधीनगर परिसरात घडली. इम्रान आणि शब्बीर अशी मृतांची नावे असून ते एका एक्स्पोर्ट कंपनीत कामाला होते.
वरळीच्या गांधीनगर परिसरात फोर सीझन हॉटेलच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री ४२ व्या मजल्यावरून मोठ्या आकाराची वीट खाली कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेले दोघे जण जवळपास अर्धा तास रस्त्यावर पडून होते. बराच वेळ त्यांना वैद्यकीय मदत मिळाली नाही. अखेर त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी महापालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवले. या घटनेत काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
----
दोषींवर कारवाई करावी!
दरम्यान, इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मोठी वीट पडल्याने बिल्डरकडून करण्यात आलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेत बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे दोघांना नाहक प्राण गमवावे लागले. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली.