Thur, June 1, 2023

किन्हवलीकर अनुभवणार बैलगाडा शर्यतीचा थरार
किन्हवलीकर अनुभवणार बैलगाडा शर्यतीचा थरार
Published on : 16 February 2023, 10:47 am
किन्हवली, ता. १६ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच किन्हवली परिसरातील चिखलगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून या स्पर्धेला परवानगी मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्याने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडामालकांना दिलासा मिळाला असून शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच किन्हवली परिसरातील चिखलगाव येथे २२ रोजी सकाळी १० वाजता आई भवानी मैदानावर बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे.