Thur, March 23, 2023

कुणबी क्रिकेट लीगची दमदार सुरुवात
कुणबी क्रिकेट लीगची दमदार सुरुवात
Published on : 15 February 2023, 9:35 am
वाडा, ता. १५ (बातमीदार) : वाडा तालुका कुणबी समाजाच्या वतीने चार दिवसीय कुणबी क्रिकेट लीग स्पर्धेला गातेस येथे सोमवारपासून दमदार सुरुवात झाली. या लीगचे हे पहिले वर्ष असून या लीगमध्ये पंधरा संघ सहभागी झाले आहेत. या लीगमध्ये १५ संघांतून २०० हून अधिक खेळाडू आपले क्रीडाकौशल्य दाखवणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, निवृत्त सैनिक विलास ठाकरे, हेमंत भोईर, नीलेश मराडे, माजी जि. प. सदस्य सुनील पाटील, पं. स. सदस्य अमोल पाटील, डॉ. भाई वलटे, गातेसच्या सरपंच संजना तरसे, मनसेचे तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, संदीप दुपारे, वैभव ठाकरे, कल्पेश पष्टे, मिलिंद बागुल आदी उपस्थित होते.