नवीन पनवेलमधील कोंडीवर तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन पनवेलमधील कोंडीवर तोडगा
नवीन पनवेलमधील कोंडीवर तोडगा

नवीन पनवेलमधील कोंडीवर तोडगा

sakal_logo
By

पनवेल, ता. १५ (बातमीदार) : नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला पनवेलकडे येणाऱ्या मार्गिकेवर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याबाबतची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारपासून वाहतूक पोलिसांनी नवीन पनवेलकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ओरियन मॉलच्या पुढून वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडी सुटली आहे.
नवीन पनवेल उड्डाण पुलाचे दोन्ही बाजूला काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलालगतच्या सिग्नलवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दररोज वाहनांची कोंडी होत होती. या कामामुळे नवीन पनवेल-माथेरान मार्गावरील वाहतूकदेखील विस्कळित झाल्याने वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पनवेलच्या सिग्नलवरून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून नवीन पनवेल उड्डाण पुलाच्या पनवेल बाजूच्या सिग्नलवरून वाहने उजव्या बाजूला वळण घेऊन मुंबई, ठाणे किंवा नवी मुंबईला जात आहेत. त्यामुळे नवीन पनवेलमधून येणाऱ्या वाहनांना आता डाव्या बाजूने ओरियन मॉलच्या पुढे जाऊन यू टर्न घेऊन मुंबई दिशेला सोडण्यात येत आहे. त्यामुळे सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे.
-------------------------------------
पुलावरून येणाऱ्या वाहनांमुळे सिग्नलच्या जंक्शनला वाहतूक कोंडी होत होती. आम्ही नवीन पनवेलमधून मुंबईकडे जाणारी वाहतूक डावीकडे वळवून त्यांना ओरियन मॉलच्या पुढे जाऊन यू टर्न दिला. त्यामुळे पुलावरून येणाऱ्या वाहनांची वाहतूक विनाअडथळा होत आहे.
- संजय नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा