Sat, June 3, 2023

ट्रकची धडक लागून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
ट्रकची धडक लागून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
Published on : 15 February 2023, 3:55 am
अंधेरी, ता. १५ (बातमीदार) ः ट्रकची धडक लागून मंगळवारी (ता. १४) झालेल्या अपघातात चंद्रिकाबेन चंद्रकांत भट्ट (वय ७७) यांचा मृत्यू झाला. दहिसर पोलिसांनी अपघाताची नोंद करून आरोपी ट्रकचालक अमरनाथ हसुरे याला अटक केली आहे. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सुधीर भट्ट आपल्या कुटुंबियांसोबत विरार परिसरात राहतात. एका लग्नकार्यानिमित्त गुजरातला राहणारे त्यांचे आई-वडील मुंबईत आले होते. ते दोघेही सध्या दहिसरमधील मावशीच्या घरी राहत होते. मंगळवारी सकाळी चंद्रिकाबेन रस्ता ओलांडत असताना त्यांना ट्रकची धडक लागली. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी नंतर ट्रकचालकास ताब्यात घेतले. सध्या त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.