अल्लाळीत क्रीडांगण विकासकामाचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्लाळीत क्रीडांगण विकासकामाचा शुभारंभ
अल्लाळीत क्रीडांगण विकासकामाचा शुभारंभ

अल्लाळीत क्रीडांगण विकासकामाचा शुभारंभ

sakal_logo
By

पालघर, ता. १६ (बातमीदार) पालघर नगरपालिका कार्यक्षेत्रातील अल्लाळी येथील क्रीडांगण विकसित करण्याचा शुभारंभ नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे यांच्या हस्ते करण्यात आला. नगर परिषदेची स्थापना होऊन २४ वर्षे झाल्यानंतर आल्याळी येथे १.७० हेक्टर जमीन नगरपरिषदेला शासनाकडून क्रीडांगणनासाठी मिळाली. यानंतर नगरपरिषदेने या मैदानाच्या विकासासाठी दोन कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. या निधीतून मैदान विकासाचा शुभारंभ नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष उत्तम घरात, स्थानिक नगरसेवक अमोल पाटील, अरुण माने, बांधकाम सभापती राजेंद्र पाटील, राधा मानकामे, अनिता किनी, भाजप गटनेते भावानंद संख्ये, नगरसेवक सुभाष पाटील, हिंदवी पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. मैदानाच्या विकासासाठी व जमीन मिळविण्यासाठी नगरसेवक अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले. पालघर नगर परिषद क्षेत्रात गणेश कुंडाचा विकास करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी अनेक कामे पालिकेने हाती घेतली असल्याची माहिती काळे यांनी दिली.