आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आग
आग

आग

sakal_logo
By

कांदिवलीतील आगीत
तीन दुकाने खाक
कांदिवली, ता. १६ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील इराणी वाडी परिसरातील शांतीलाल मोदी मार्गावरील तीन दुकाने बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झाली. रात्री पावणेदहाच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मुख्य मार्गावरील गाला झेरॉक्स दुकानाला आग लागली. आगीचा भडका वाढल्याने इतर दुकानदारांनी ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत गाला झेरॉक्स, टिचीस टेलर आणि टीव्ही दुरुस्तीचे दुकान जळून खाक झाले.