Thur, March 23, 2023

संदीप ओंबासे यांची नियुक्ती
संदीप ओंबासे यांची नियुक्ती
Published on : 16 February 2023, 11:36 am
कल्याण, ता. १६ (बातमीदार) : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त आयोग समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिक येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या दरम्यान इंडिया तायक्वांदो अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि इंडिया-कोरिया जागतिक तायक्वांदोचे समन्वयक किराश बेहेरा यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन ओंबासे यांना गौरवण्यात आले. ठाणे जिल्ह्यापासून झालेली सुरुवात राज्य, देश आणि आता जागतिक पातळीवर काम करायची मिळालेली संधी याचा नक्कीच फायदा घेऊन खेळांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करणा असल्याचा विश्वास संदीप ओंबासे यांनी व्यक्त केला.