महिला कर्मचाऱ्यांकडून पतसंस्थेला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला कर्मचाऱ्यांकडून पतसंस्थेला गंडा
महिला कर्मचाऱ्यांकडून पतसंस्थेला गंडा

महिला कर्मचाऱ्यांकडून पतसंस्थेला गंडा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.१६ (वार्ताहर): पतसंस्थेत कामाला असलेल्या एका महिलेने खोटे दागिने गहाण ठेऊन पतसंस्थेकडून ९ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज घेऊन अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
परेल भोईवाडा येथील माने मास्तर को ऑप. क्रेडीट सोसायटीची सानपाडा येथे शाखा आहे. या पतसंस्थेत २०१३ मध्ये वर्षा सोनवणे क्लार्क म्हणून रुजू झाल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये वर्षा हिने आपल्याच पतसंस्थेत ३० ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे मंगळसूत्र तारण ठेवून ६५ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये काही बनावट दागिने गहाण ठेऊन दीड लाखांचे कर्ज घेतले होते. अशाच पद्धतीने ऑगस्ट २०१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत त्यांनी ९ लाख ३८ हजारांचे कर्ज घेतले होते. पतसंस्थेत तारण ठेवलेले सोने वर्षा सोनवणे याच सीलबंद करत होत्या. दरम्यान, २०२२ मध्ये वर्षा सोनवणे यांनी कामावर येण्यास नकार दिल्याने पतसंस्थेने तिच्या जागेवर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवले होते. त्यानंतर पतसंस्थेने सोने तारण कर्ज घेतलेल्या लोकांना नोटीस पाठवून त्यांना कर्जाचे हप्ते भरण्यास सांगण्यात आले. मात्र, अनेकांनी कर्ज घेतले नसल्याचे सांगितल्यामुळे तारण ठेवलेल्या १० कर्ज प्रकरणातील दागिन्यांची तपासणी केली असता सर्व दागिने बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पतसंस्थेने पोलिस ठाण्यात वर्षा सोनवणे विरोधात तक्रार दाखल केली आहे.