घरफोडी करणारे दांपत्य जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणारे दांपत्य जेरबंद
घरफोडी करणारे दांपत्य जेरबंद

घरफोडी करणारे दांपत्य जेरबंद

sakal_logo
By

घरफोडी करणारे दाम्पत्य जेरबंद
मानखुर्द, ता. १६ (बातमीदार) ः घरफोडी करून पळालेल्या सौरव यादव (वय २४) आणि शाहिना यादव (वय २२) या पती-पत्नीला चेंबूरच्या टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना अटक करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांना वेटरचा वेश धारण करावा लागला. दाम्पत्याकडून चोरलेले दागिने व रोख रक्कम पथकाने जप्त केली आहे.
मंगळवारी (ता. १४) दुपारी चेंबूरमधील शेल कॉलनीच्या इमारत क्रमांक नऊमधील सदनिकेच्या दरवाजाची कडी तोडून यादव पती-पत्नीने दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरून पळ काढला होता. टिळकनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दोघे पळून गेलेल्या रिक्षाचा क्रमांक मिळवण्यात त्यांना यश आले. रिक्षामालकाच्या चौकशीतून पोलिसांना आरोपींचा छडा लागला. एका हॉटेलमध्ये ते दोघे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वेटरच्या वेशात पाळत ठेवून मध्यरात्री दोघांना ताब्यात घेतले.