इंदिरा मराठे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरा मराठे यांचे निधन
इंदिरा मराठे यांचे निधन

इंदिरा मराठे यांचे निधन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १६ : मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक राजन मराठे यांच्या मातोश्री इंदिरा मराठे (वय ७६) यांचे गुरुवारी (ता. १६) वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या उपासक व मूळच्या डोंबिवलीकर अशी त्यांची ओळख होती. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर शिवमंदिर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधीवेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार राजू पाटील, माजी आमदार रमेश पाटील, माजी नगरसेवक राहुल दामले, पप्पू भोईर, नंदू म्हात्रे, नवीन सिंग, मुकुंद पेडणेकर, विश्वदीप पवार, नितीन पाटील, रवी पाटील यांच्यासह श्री गणेश मंदिर संस्थानाचे कार्यवाह प्रवीण दुधे, सुहास आंबकेर, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, मनसेचे विनोद पाटील, संदेश प्रभुदेसाई, राहुल कामत, डॉ. सुनील शिरोडकर, डॉ. मंगेश पाटे, पमा परुळेकर, एकता नगरचे रहिवासी आदींसह मित्र परिवार उपस्थित होते.