जोंधळे कॉलेजमध्ये पेपर सादरीकरण

जोंधळे कॉलेजमध्ये पेपर सादरीकरण

डोंबिवली, ता. १६ (बातमीदार) स. ह. जोंधळे कॉलेज येथे पेपर सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्यात प्रणाली, क्लाउड कॉम्प्युटिंग, आयटी प्रणाली, रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन या विषयावर विद्यार्थ्यांनी पेपर सादरीकरण केले. यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये ऋषी विश्वकर्मा, मोहम्मद इक्बाल, अब्दुल खैरान, संगम यादव, मिताली खामकर, दुसऱ्या ग्रुपमध्ये सुष्मिता साहू, प्रणिता मेकदंबर, शुभम राय, सुप्रिया नारखेडे हे विद्यार्थी या स्पर्धेचे विजेते ठरले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सीईओ नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रा. डॉ. मनीषा निकम उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये जोंधळे कॉलेजचे १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या व्यतिरिक्त ठाणे, टिटवाळा, नवी मुंबई, आसनगाव, मुंबई या शहरातील कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com