मुंबई पोलिस अहमदाबादेत दाखल

मुंबई पोलिस अहमदाबादेत दाखल

मुंबई, ता. १६ : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्या प्रकरणात पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक अहमदाबादला दाखल झाले आहे. या प्रकरणात दर्शनच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यासाठी पवई पोलिसांचे तीन अधिकारी गुरुवारी दर्शनच्या घरी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी वडील आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली. दर्शनच्या बहिणीने या प्रकरणात जातीय भेदभाव झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणी पवई पोलिस पुन्हा एकदा जबाब घेण्याची शक्यता आहे.
आयआयटी मुंबईतील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकीने रविवारी (ता. १२) वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जातीय भेदभावातून दर्शनने आत्महत्या केल्याचा आरोप बहीण जान्हवी सोळंकीने केला होता. तो अनुसूचित जातीचा असल्याचे कळाल्यानंतर काही जणांचे दर्शनसोबतच्या वागणुकीत बदल झाल्याचा आरोप मृत दर्शनच्या बहिणीने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com