२२७ प्रभागांत शिव आरतीचा जयघोष!

२२७ प्रभागांत शिव आरतीचा जयघोष!

मुंबई, ता. १६ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १९) मुंबईत भाजपतर्फे २२७ प्रभागांमध्ये शिवजयंती कार्यक्रम होणार आहेत. आघाडी आणि मोर्चे मिळून ३४६ ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड्. आशीष शेलार यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान सोहळ्यात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड्. आशीष शेलार यांनी केले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपतर्फे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे आता ‍मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मुंबईत प्रत्येक प्रभागात नाक्या-नाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून प्रत्येक ‍ठिकाणी वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या ‘जय जय शिवराया...’ आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सावरकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

देखावे, चित्रप्रदर्शन आणि व्याख्याने
१. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिव व्याख्याने, गरिबांना विविध स्वरूपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन आदी विविध कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमून जाणार आहे.
२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊन भारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून त्याची माहितीही आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत, असे ॲड्. आशीष शेलार म्हणाले. मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्त्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com