दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : पनवेल आणि उरण भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील पनवेलमधील घटनेत सावत्र वडिलाने १४ वर्षीय मुली; तर दुसऱ्या घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. या दोन्ही घटनेतील आरोपींवर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

उरण भागात बुधवारी (ता. १५) घडलेल्या पहिल्या घटनेत १४ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आईला दिल्यानंतर तिने उरण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. पनवेलच्या विचुंबे भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एका सावत्र बापाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. गेल्या आठवड्यात पीडित मुलीला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला आईने रुग्णालयात गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे उघड झाले. त्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी मुलीकडे विचारपूस केली असता, सावत्र बापाने तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडित मुलीने दिली. त्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना संशयित आरोपी असणाऱ्या सावत्र बापाला अटक केली.