
- रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई, ता. १७ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १९) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका, तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे ः विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन पाचवी, सहावी मार्गिका
कधी ः सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसवरून येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्ग
कुठे ः सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
कधी ः सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी डाऊन मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी वांद्रे/गोरेगावसाठी सुटणारी डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
कुठे ः मुंबई सेंट्रल ते माहीम जलद मार्गावर
कधी ः शनिवारी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते अंधेरी/सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहेत.