Thur, June 1, 2023

लोअर परळमधील व्यावसायिक इमारतीत आग
लोअर परळमधील व्यावसायिक इमारतीत आग
Published on : 17 February 2023, 5:21 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : लोअर परळ भागातील सेनापती बापट मार्गावर असलेल्या रघुवंशी मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी (ता. १७) भीषण आग लागली. ही आग एका व्यावसायिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर संध्याकाळी ७.१५ वाजता लागल्याची माहिती मिळाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि चार जंबो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. यासोबतच स्थानिक पोलिस आणि मुंबई महापालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रात्री उशिरापर्यंत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नव्हते.