Sun, May 28, 2023

मुरबाड शहरातील दिवसाआड पाणी
मुरबाड शहरातील दिवसाआड पाणी
Published on : 18 February 2023, 12:10 pm
मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारपासून (ता. १७) मुरबाडमधील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे मुरबाड नगर पंचायतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना बागेश्वरी तलाव व शिरवली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी शिरवली धरणाची लघु पाटबंधारे विभागाच्यामार्फत दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी बरेचसे पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे शिरवली धरणात कमी पाणी शिल्लक राहिले आहे. पाऊस सुरू झाल्याशिवाय धरणातील पाणीसाठा वाढणार नाही. त्याचा फटका मुरबाड शहरातील नागरिकांना बसणार आहे व पावसाळा सुरू होईपर्यंत दोन दिवसातून एकदा पाणी मिळणार आहे