देवाळेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवाळेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा
देवाळेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा

देवाळेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा

sakal_logo
By

शिवशंभोच्या नावाचा गजर
खारघर, बातमीदार
खारघरमधील पुरातन शिव मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अबालवृद्ध भक्तांनी महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. मंडपात खारघर ग्रामस्थ बँजो पथकाकडून शिव-पार्वतीवर आधारित देवदेवतांच्या भक्तिमय संगीतामुळे मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
------------------------------------------------------
खारघरवासियांचे श्रद्धेचे स्थान असलेले देवाळेश्वर येथील पुरातन शिवकालीन मंदिर सर्वश्रृत आहे. शिवाजी महाराजाच्या काळात हे मंदिर उभारण्यात आले होते. नंतर महमद गझनीने या मंदिराची तोडफोड केल्याचे गावातील जाणकार सांगतात. खारघर शहर निर्माणपूर्वी विटा आणि कौलारू असलेले मूळ मंदिर कालांतराने बदलेले आहे. पुरातन मंदिर असल्यामुळे महाशिवरात्रीला दर्शनासाठी खारघर वसाहतीमधील तसेच परिसरातील रोहिंजन, ओवेपेठ, इनामपुरी, तळोजा, खारघर परिसरातील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी वाढत्या उन्हात भक्ताची गैरसोय होवू नये, म्हणून मंडप उभारण्यात आला होता. यावेळी पहाटेपासूनच महादेवाचा अभिषेक, सकाळी आठ ते सायंकाळी सात या वेळेत भजन, हरिपाठ कार्यक्रम झाले. भक्तांची गैरसोय होवू नये म्हणून शिव मंदिर ट्रस्टूने स्वयंसेवकाची नेमणूक केली होती. तर खारघर पोलिस आणि वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
------------------------------------------------
खारघर परिसरात भक्तिमय वातावरण
तळोजा मध्यवर्ती कारागृह लगत असलेल्या टेकडीवरील स्वयंभू शिव मंदिरात दर्शनाला भाविकांची रात्रीपासून गर्दी केली होती. येथील मंदिरात स्वयंभू पिंड आहे. महाशिवरात्रीला परिसरातील ग्रामस्थ दर्शनासाठी येतात. तसेच कोपरा गावातील श्री महादेव शिव मंदिरात भक्तांनी घेतले. या मंदिरात सात फूट महादेवाची मूर्ती असून त्यांच्या दोन्ही बाजूला गणपती आणि पार्वतीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.