क्रीडाविश्‍वात हर्षीलची सुवर्ण भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडाविश्‍वात हर्षीलची सुवर्ण भरारी
क्रीडाविश्‍वात हर्षीलची सुवर्ण भरारी

क्रीडाविश्‍वात हर्षीलची सुवर्ण भरारी

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १८ (बातमीदार) : लहानपणापासूनच खेळाची आवड जोपासत चेंडूफेक, गोळाफेक व थाळीफेक अशा क्रीडा प्रकारांत विविध स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत १४ वर्षीय हर्षिल खानविलकर याने सुवर्ण, रौप्य पदकांची लयलूट करत उत्तुंग भरारी मारली आहे. पवई येथील एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल शाळेत आठवीत शिकणारा हर्षिल याला लहानपणापासूनच खेळाची आवड, त्यामुळे चेंडूफेक आणि थाळीफेक या प्रत्येक क्रीडा प्रकारांत त्याने सातत्य राखत पदके पटकाविण्याची किमया साधली आहे. त्‍याला त्‍याची आई मीनल व मिलिंद खानविलकर यांचे कायम प्रोत्‍साहन मिळाले आहे.
मुंबई उपनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, मुंबई क्रीडा महोत्सव, आंतरशालेय व जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्‍ये हर्षिल याने थाळी फेक व चेंडूफेक स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली. मुंबई उपनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नुकत्‍याच घेण्यात आलेल्या चेंडूफेक स्पर्धेत ५६.६० मीटर लांब चेंडू फेकत सुवर्णपदक जिंकले; तर गोळा फेक स्पर्धेत ९.६३ मीटर लांब गोळा फेकत प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद पालघर द्वारा आयोजित विभागीय शालेय क्रीडा २०२२-२०२३ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या थाळी फेक आंतर शालेय स्पर्धेत हर्षिल याने सुवर्णपदक जिंकले. मुलांमध्ये १४ वर्षांखालील वयोगटात गोळाफेक स्पर्धेत ११.१० लांब गोळा फेकत मागील ४५ वर्षांचा वायएमसीएमधील विक्रम मोडण्याची कामगिरीदेखील त्याने साध्य केली; तर २०२२ मध्ये ७ सुवर्णपदके व २०२३ मध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य पदकाची कमाई हर्षिलने केली आहे.
त्‍याच्‍या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी काळात राष्‍ट्र स्‍तरावर पदक पटकवण्याची सध्‍या तो तयारी करत असून त्‍याच्‍या भावी वाटचालाली अनेकांनी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

आई-वडिलांनी नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन दिले. आजही ते मला जिद्दीने खेळण्यासासाठी सल्ला देतात. शिक्षक दीपक पाटील व वैयक्तिक प्रशिक्षक निमेश देसाई यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मी हे यश संपादन करू शकलो.
– हर्षिल खानविलकर


दररोज दोन तास सराव हर्षील कडून करून घेण्यात येतो. त्याच्यात एक प्रकारची जिंकण्याची जिद्द आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी १६ वर्षांखालील वयोगटासाठी त्याच्याकडून सराव करून घेण्यात येत आहे.
– निमेश देसाई, क्रीडा प्रशिक्षक