स. ह. जोंधळे कॉलेजमध्ये ‘टेक्नोमिनिया’ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स. ह. जोंधळे कॉलेजमध्ये ‘टेक्नोमिनिया’ उत्साहात
स. ह. जोंधळे कॉलेजमध्ये ‘टेक्नोमिनिया’ उत्साहात

स. ह. जोंधळे कॉलेजमध्ये ‘टेक्नोमिनिया’ उत्साहात

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १८ (बातमीदार) : स. ह. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये टेक्नोमिनिया २०२३ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टेक्नोमिनिया या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानामध्ये वाढ होते. त्यानंतर त्यांना स्टेजवर सादरीकरण करण्याचे धाडस निर्माण होते. नेतृत्वगुण, धाडस यांसारख्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हाव्यात, विचार करण्याची क्षमता आणि विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान निर्माण व्हावे, या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली होती.
टेक्नोमिनिया या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषा, सेमिनार स्पर्धा, याचबरोबर बॉलीवूड डे, मिस मॅच डे आणि ट्रेडिशनल डे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ४८० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांपैकी मुंबईतील कॉलेजमधून ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पेपर सादरीकरण ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेतही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सेक्रेटरी संचालिका वैशाली जोंधळे, संचालक सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, नॅशनल एडमिन श्वेता जोंधळे, अभिनेता अविनाश थोरात, लोकल बंधन ॲप डायरेक्टर धनंजय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या तिन्ही दिवस ‘सकाळ स्वास्थ्यम’ उपक्रमाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ‘सकाळ’ समूहाकडून सुरेश ठाकूर यांनी ‘सकाळ स्वास्थ्यम’ या आरोग्य, योगा आणि आयुर्वेद यावर आधारित स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देऊन सर्वांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी म्हात्रे यांनी केले. प्राचार्या डॉ. मनीषा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.