Sat, June 3, 2023

कासात शिवमंदिरांत भाविकांची गर्दी
कासात शिवमंदिरांत भाविकांची गर्दी
Published on : 18 February 2023, 11:21 am
कासा, ता. १८ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त कासा परिसरातील अनेक मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. कासा येथील शिवमंदिर, वधना येथील शिवमंदिर तसेच दापचारी येथील प्रसिद्ध पुरातन शिवमंदिरात भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या निमित्ताने कबड्डी आणि व्हॉलीबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते.