
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन
मुंबई, ता. १८ ः आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४० व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. १७) फडके स्मारक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फोर्ट येथील (धोबी तलाव) वासुदेव बळवंत फडके चौकातील क्रांतिवीरांच्या अर्धपुतळ्याला क्रांतिवीरांचे सातवे वंशज ॲड. राज सराफ यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या कार्यक्रमात समितीचे कार्य उपाध्यक्ष श्रीराम देवधर यांनी रायगडमधून जाणाऱ्या महामार्गाला क्रांतिवीरांचे नाव देण्याची मागणी पुन्हा केली. या वेळी या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष सहावे वंशज ज्योती फडके सराफ, पदाधिकारी पूजा नेरूरकर, संयुक्त सचिव राज सराफ, खजिनदार अनघा बेडेकर, मंदार बेडेकर,भूषण शितुत, सुप्रिया पोवळे, धनेश कुलकर्णी, उपाध्यक्ष देवधर गुरुजी, सचिव जयेंद्र सराफ आणि ए पालिका विभागाचे झायले, मेंटेनन्स खात्याचे नागेश लोंबते आणि कर्मचारी अभिवादनासाठी उपस्थित होते.