तिळसे येथे फुलला भक्तांचा मळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिळसे येथे फुलला भक्तांचा मळा
तिळसे येथे फुलला भक्तांचा मळा

तिळसे येथे फुलला भक्तांचा मळा

sakal_logo
By

वाडा, ता. १८ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्ताने शनिवारी (ता. १८) तालुक्यातील तिळसे येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दश॔न घेतले. त्यामुळे तिळसा परिसर भक्तांनी फुलून गेला होता. त्याचप्रमाणे तालुक्यातील नारे, कोंढले, घोडमाळ, कुडूस, काटी, गातेस व सापने येथील महादेवाच्या मंदिरात दश॔न घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आमदार शांताराम मोरे, उपनेते प्रकाश पाटील, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, शरद पाटील, संदीप पवार, रोहिदास शेलार यांनीही तिळशेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यात्रेत भाविकांना जिजाऊ संघटनेच्या वतीने पाणी, सरबत व फराळाची मोफत सोय केली होती.