भिवंडीत तीन ठिकाणी दागिने चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत तीन ठिकाणी दागिने चोरी
भिवंडीत तीन ठिकाणी दागिने चोरी

भिवंडीत तीन ठिकाणी दागिने चोरी

sakal_logo
By

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) ः महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याच्या तीन घटना शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काल्हेर येथे दुर्गेश पार्क प्राकृता बिल्डिंगसमोर शर्मिला मुकेश खंडेलवालया या पहाटे सहा वाजता मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले; तर शहरातील ब्रह्मानंद नगर साईदर्शन बिल्डिंगसमोरील मार्गावर लक्ष्मी रामचंद्र चाफेकर (वय ६६) या सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना मागून दुचाकीवरून आलेल्या चोरांनी गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली. त्याचप्रमाणे पद्मानगरमधील नर्मदा मधू सिरसिल्ला या आपल्या नातवाला पाहण्यास जात असताना कणेरीतील जरीमरी देवळाजवळ एका व्यक्तीने मागून येऊन तोंड दाबून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले. मात्र नर्मदा यांनी ते हाताने धरल्याने मंगळसूत्राचा काही भाग चोराने पळवून नेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.