‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
महिन्याभराच्या कालावधीत ३६१ स्‍वयंसेवक प्रशिक्षित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे परळमधील शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्रात १२ दिवसांचे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. तिथे नावनोंदणी करून प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईकर युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत ३६१ स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
३६१ स्‍वयंसेवकांमध्‍ये एनएसएस, एनसीसी, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, विविध खासगी कंपन्‍यांचे कर्मचारी, रुग्‍णालयांमध्‍ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी, नागरिक इत्‍यादींना सहभागी करून घेण्‍यात आले आहे, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या स्‍वयंसेवकांपैकी काही जणांनी अपघातग्रस्तांना मदतही केली आहे. आगीच्‍या घटनांमध्‍ये समन्‍वय म्हणून मदत करण्‍यासही त्यांनी सुरुवात केली आहे. निश्चितच ही एक सकारात्मक बाब असून प्रशिक्षित ‘आपदा मित्र’ हे आपत्कालीन परिस्थितीत खऱ्या अर्थाने मित्र तथा सखी ठरत असल्याचे अधोरेखित होत असल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत एक हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

असे आहे प्रशिक्षण
- ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रथमोपचार, हृदयविकाराच्या अनुषंगाने सीपीआर, जखमींवर करावयाच्या उपचार पद्धती व बँडेज बांधण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- शोध व बचावकार्य करणे, उंच इमारतींवर दोरांच्या सहाय्याने वाचवणे, आग विझवणे, भूकंप, वादळ वा पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी रेस्क्यू आॅपरेशन करण्याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जात आहे.
- गर्दी, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, रासायनिक-जैविक-आण्विक आपत्ती इत्यादींच्या वेळी घ्यावयाची खबरदारी व करावयाचे बचावकार्य याबाबतही प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले जात आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने लागू असणारे कायदे व कार्यरत संस्था यांचीही माहिती प्रशिक्षणार्थींना दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com