Thur, June 1, 2023

स्काऊट गाईड स्पर्धेत ठाण्याच्या विद्यार्थ्यांचे यश
स्काऊट गाईड स्पर्धेत ठाण्याच्या विद्यार्थ्यांचे यश
Published on : 23 February 2023, 11:25 am
ठाणे, ता. १९ (बातमीदार) : १८ वी नॅशनल जंम्बुरी स्पधा राजस्थान येथे पार पडल्या. जंम्बुरी म्हणजे एक विचाराने काम करणे, विचारांची देवाणघेवाण करणे. या जंम्बुरीसाठी देशातील ३५ हजारपेक्षा जास्त स्काऊट गाईड सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून दोन हजार ५०० स्काऊट गाईड सहभागी झाले. या मध्ये ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरातील विद्याथीदेखील सहभागी झाले होते. उद्घाटन राष्ट्रपती द्रोपदी मूमर््मू व राज्यस्थानचे मुख्यमंत्री गहलोस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी अनेक स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले होते. या सर्व स्पर्धेत डॉ. बेडेकर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यात महाराष्ट्राला ए व बी ग्रेड प्राप्त झाले. स्पर्धेत विशेष कार्य केल्याबद्दल प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले.