जीवनमान उंचावणारे शहर घडवणार

जीवनमान उंचावणारे शहर घडवणार

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : शहराच्या विकासकामांसाठी अवघ्या ६ महिन्यात १ हजार २६१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. उल्हासनगरात मेट्रो येणार असून फ्लायओव्हर उभारले जाणार आहेत. इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार असून जीवनमान उंचावणार असे उल्हासनगर घडवणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

उल्हासनगर महापालिकेने सी ब्लॉक येथील मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी केंद्र शासनाच्या अनुदानातून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ८६ गाड्यांचा समावेश होता. त्यामध्ये ५४ घंटागाड्या आहेत. या सर्व गाड्यांची एकूण किंमत २२ कोटी ७२ लाख रुपये आहे. त्यात पॉवर स्वीपिंग मशीन, स्ट्रीट लाईट मशीन, सेक्शन मशीन आदी वाहनांच्या समावेश आहे. तसेच ८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या खडेगोलवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेले विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन, दिव्यांग व्यक्तींच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर, रिजेन्सी निर्माणने दिलेल्या प्लॅस्टिक क्रशर मशीनचे वरच्युअल लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार नरेंद्र पवार, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करूणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, प्रियंका राजपूत, शहर अभियंता प्रशांत सोळंके, नगररचनाकार प्रकाश मुळे, मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, तुषार सोनवणे, दत्तात्रय जाधव, जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण, नाना बागूल, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, कलवंतसिंग सोहता, भाजपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

--------------
हरिद्वार एक्सप्रेसची गुड न्यूज
उल्हासनगरातून थायरासिंग दरबारचे जवळपास पाच हजार श्रद्धाळू दर मार्च महिन्यात हरिद्वार येथे हरिद्वार एक्स्प्रेसने जात असतात. ही एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केली होती, त्यामुळे नाराजी पसरली होती. २० मार्चपासून हरिद्वार एक्स्प्रेस सुरू होत असल्याची गुड न्यूज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगताच शहरवासीयांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com