Thur, March 30, 2023

डॉ. बेडेकर विद्यामंदिरचे यश
डॉ. बेडेकर विद्यामंदिरचे यश
Published on : 23 February 2023, 11:25 am
ठाणे, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी, मुंबई यांच्यातर्फे मुंबई विभागामधून १९ शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये ३३६ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यापैकी डॉ. बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागाच्या २६ कॅडेट्सने या एनसीसी नेवल कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. वार्षिक प्रशिक्षण शिबिर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टर पुणे येथे पार पडले. बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक शाळेने विविध स्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी करीत अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. याअंतर्गत झालेल्या रिले, खोखो, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.