Thur, June 8, 2023

दिव्यात ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन
दिव्यात ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन
Published on : 20 February 2023, 11:21 am
दिवा, ता. १९ (बातमीदार) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला उपशहर प्रमुख योगिता नाईक व विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक यांच्या वॉर्ड क्र. २८ दातिवली विभागाच्या मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, दिवा उपशहर प्रमुख सचिन पाटील, अभिषेक ठाकूर, चेतन पाटील, नवनीत पाटील, हेमंत नाईक, अक्षय म्हात्रे, शशिकांत कदम, अजित माने, संजय निकम, संजय जाधव व महिला आघाडीच्या विनया कदम, माधुरी नाईक, सुशीला रसाळ, सुनीता अहिरे, कविता उतेकर व ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी व कायर््कते उपस्थित होते.