महिलांमध्ये कामाचे अचूक नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांमध्ये कामाचे अचूक नियोजन
महिलांमध्ये कामाचे अचूक नियोजन

महिलांमध्ये कामाचे अचूक नियोजन

sakal_logo
By

वसई, ता २१ (बातमीदार) : महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत कुटुंबात देखील त्यांना तडजोड करायची सवय असते. कामाचे वेळापत्रक अचूक आणि पुरेपूर नियोजन महिलांकडूनच शिकावे महिलांनी आपल्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून पुढे येऊन त्यांनी काम केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था येथे संस्थेच्या सचिव विंदाली प्रभुदेसाई यांनी केले.
वसई पापडी येथील ज्येष्ठ नागरिक समाजकल्याण ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या सचिव विंदाली प्रभुदेसाई आणि त्यांचे सहकारी हेमलता हटकर, शुभदा जपे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता.
या संस्थेमार्फत एकाकी जीवन जगणारे ज्येष्ठ नागरिकांना आधार दिला जातो. त्याचबरोबर मनोरंजात्मकासह विविध उपक्रम राबविले जातात. यावेळी कुटूंब सांभाळत असताना महिला करत असलेल्या कामांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या अंगी असलेल्या मेहनत, चिकाटीचा लेखाजोगा ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून मांडण्यात आला.
आजच्या घडीला महिलांचे स्थान उंच शिखरावर आहे. प्रत्येक क्षेत्रात आपले नाव लौकिक करत आहेत, त्यामुळे अशा महिलांकडून शिकून अन्य महिलांनी पुढे आले पाहिजे, यासाठी व्याख्यानाचे आयोजन केले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अशा शब्दात संस्थेच्या सचिव विंदाली प्रभुदेसाई यांनी मत मांडले.