दुचाकी, मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद

दुचाकी, मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद

मानखुर्द, ता. १९ (बातमीदार) ः ट्रॉम्बे पोलिसांनी दुचाकी, मोबाईल चोरणाऱ्या तिघांना ताब्यात घेत मुंबई, नवी मुंबई तसेच पिंपरी चिंचवड येथील एकूण दहा गुन्ह्यांची उकल केली आहे. अकिब अन्सारी व वलिउल्लाह शाह ऊर्फ अलिउल्लाह ऊर्फ अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. हे तिघेही चीता कॅम्प परिसरातील रहिवासी आहेत.
या टोळीने ट्रॉम्बे परिसरातून २ व गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १ मोबाईल चोरला आहे. याशिवाय काळाचौकी, आग्रीपाडा, पिंपरी–चिंचवड, वाकड, विमानतळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकींची चोरी केली असून आणखी एका दुचाकी चोरीची तसेच नेरूळ पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याची चौकशी पोलिस करत आहेत.
ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाराष्ट्र नगर लगतच्या भीमनगर झोपडपट्टीतून मागील वर्षी एका मोबाईलची चोरी झाली होती. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक शरद नाणेकर तपास करत होते. या दरम्‍यान चीताकॅम्प परिसरातील रहिवासी असलेले आरोपी हे मोबाईल आणि दुचाकी चोरत असल्याची खात्रीशीर माहिती खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे अकिब व अलीला अटक करण्यात पथकाला यश आले तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी एकूण १० गुन्ह्यांची उकल करत चोरलेले मोबाईल तसेच दुचाकी जप्त केल्या आहेत. शरद नाणेकर पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com