शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष
शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

sakal_logo
By

वसई, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ढोलताशांचा गजर व लेझीमसहित शिवाजी महाराज, जिजाबाई व मावळ्यांची वेशभूषा साकारत लहान मुलेही या मिरवणुकीत सहभागी झाले होती.
शिवजयंती निमित्त पालघर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. इतिहासप्रेमी, शाळा, सामाजिक संघटनांनी यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. काही ठिकाणी पोवाडे, भाषण, नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सुट्टीचा दिवस असतानादेखील शाळेतील मुलांनी सहभाग घेत मिरवणूक काढली होती. या वेळी कोणी शिवाजी महाराज, कुणी जिजाऊ, तर कोणी मावळे झाले होते.
---------------
वसई : विरार येथे शिवाजी महाराजांचा जयघोष करत चिमुकले मिरवणुकीत सहभागी झाले होते.