चिकू महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकू महोत्सव उत्साहात
चिकू महोत्सव उत्साहात

चिकू महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

बोर्डी, ता. १९ (बातमीदार) : बोर्डी येथे १८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या चिकू महोत्सवाचे उद्‌घाटन स्वातंत्र्यसैनिक जयराम बळवंत पाटील यांच्या हस्ते, तसेच सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जनार्दन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार माजी विद्यार्थी संघाच्या एस आर सावे शिबिर निवासाच्या पटांगणात करण्यात आले. नॉर्थ कोकण चेंबरचे अध्यक्ष दीपक चौधरी, इंडिया टुरिझमच्या सहाय्यक निर्देशिका शतरुपा आदी उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चिकूपासून बनवलेले उत्पादने तसेच विविध वस्तू स्थानिक खाद्यपदार्थ व तारपा आदिवासी नृत्य इत्यादीची या महोत्सवात रेलचेल आहे.