होळीसाठी मध्य रेल्वेच्या सहा विशेष रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळीसाठी मध्य रेल्वेच्या सहा विशेष रेल्वे
होळीसाठी मध्य रेल्वेच्या सहा विशेष रेल्वे

होळीसाठी मध्य रेल्वेच्या सहा विशेष रेल्वे

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : होळी सणाच्या रंगाची मज्जा लुटण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे सहा विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण मंगळवारपासून (ता. २१) रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०५५६२ होळी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३ मार्च २०२३ ते २७ मार्च २०२३ पर्यंत दर सोमवारी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता जयनगरला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०५५६१ होळी विशेष जयनगरहून ११ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ पर्यंत दर शनिवारी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या दोन्ही होळी विशेष रेल्वे गाड्या कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिक्की, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर आणि दरभंगा स्थानकांवर थांबणार आहे.