Mon, June 5, 2023

विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Published on : 19 February 2023, 2:40 am
रेवदंडा ता.१९ (बातमीदार): मुरुड तालुक्यातील तळेखार येथील एका २२ वर्षीय युवतीचा तिच्यात चुलत काकानेच विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पिडीत युवतीने रेवदंडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार युवती व तिचे वडील बेडरूममध्ये झोपले असताना बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याचे पाहच तिच्या चुलत काकाने तिच्या वडिलांना उठवण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी आरोपी चुलत काका राजेश शिंदेवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेवदंडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे