कोएसो इंदुबाई वाजेकर शाळेत विज्ञान प्रदर्शन

कोएसो इंदुबाई वाजेकर शाळेत विज्ञान प्रदर्शन

नवी मुंबई : कोएसो इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत १५ व १६ फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शन, भित्तीचित्र स्पर्धा आणि आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन भरवण्यात आले होते. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध सण, उत्सवाच्या प्रतिकृती तयार करून त्याची माहिती दिली. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे विस्मृतीत गेलेल्या जुन्या खेळांविषयी माहिती दिली. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन या विषयावर आधारित विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या. चौथीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्य आणि त्या राज्यातील खाद्यसंस्कृती, वेशभूषा, पारंपरिक श्रद्धास्थाने, सांस्कृतिक वारसा या सर्वांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था, आमच्यासाठी गणित, स्वच्छता आणि आरोग्य, पर्यावरणातील नवोपक्रम इत्यादी विविध विषयांवर प्रतिकृती तयार केल्या होत्या. भित्तिपत्रकेही तयार केली होती. प्रदर्शनाच्या उद्‍घाटनाला शाळा समितीचे अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे, शाळा समिती सदस्य नंदकुमार वाजेकर, माजी मुख्याध्यापिका आणि शाळा समिती सदस्य अंजली उर्हेकर, शाळा समिती सदस्य देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी कोकीळ उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com