Sun, June 4, 2023

आनंदनगरमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्साहात साजरी
आनंदनगरमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्साहात साजरी
Published on : 21 February 2023, 6:13 am
ठाणे, ता. २० : कोपरी आनंदनगर येथे ‘एक गाव, एक शिवजयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सकाळी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांनी अभिवादन केले. सध्यांकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक नगर, केदारेश्वरनगर, गांधीनगर ते आनंदनगर अशा भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात पारंपरिक वांद्यवृदाच्या तालावर पारंपरिक वेशभूषा करून तरुणांनी सहभाग घेतला. दरम्यान ‘एक गाव, एक शिवजयंती’ सोहळ्यामुळे आनंदनगर परिसरात एकोप्याचे दर्शन झाले.