Mon, May 29, 2023

चारचाकी आणि ट्रेलरच्या अपघात तीन ठार चार जखमी
चारचाकी आणि ट्रेलरच्या अपघात तीन ठार चार जखमी
Published on : 19 February 2023, 4:35 am
पेण, ता. १९ (वार्ताहर): पेण खोपोली महामार्गावरील हटवणे कॉलनीनजीक एका चारचाकी आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात चारचाकीमधील ३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. तालुक्यातील सावरसई येथील रहिवाशी असणारे कुटुंब चारचाकीने खोपोलीच्या दिशेने जात असताना चारचाकी चालकाने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातग्रस्तानंतर स्थानिकांनी आपत्कालीन यंत्रणेला माहिती देत जखमींना नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.