Wed, May 31, 2023

विक्रमगड हायस्कूल येथे सदिच्छा समारंभ
विक्रमगड हायस्कूल येथे सदिच्छा समारंभ
Published on : 20 February 2023, 11:43 am
विक्रमगड, ता. २० (बातमीदार) : विक्रमगड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकताच इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अजित घोलप हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष समीर आळशी व शालेय शिक्षण कमिटी अध्यक्ष जनार्दन पाथरवट हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील सर यांनी केले .पूर्वा भानुशाली, वैभव कनोजा, वैभव गुरव, विजय इतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाले सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.