श्रम संस्कार शिबीरात विद्यार्थ्यांचे प्रबोधन

श्रम संस्कार शिबीरात विद्यार्थ्यांचे प्रबोधन

मोखाडा, ता. २१ (बातमीदार) : राष्ट्र विकासामध्ये राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रनिष्ठा, समता, बंधुता हे घटक महत्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन प्रयोगशिल शिक्षक आणि निवेदक नितीन आहेर यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठ व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरातील व्याख्यानमालेत ते बोलत होते. सामाजिक मूल्ये आजच्या युवकांच्या मनामध्ये रुजली पाहिजेत. समाजामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. राष्ट्रपुरुषांचे विचार कृतीत आणले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजोग व्हांडे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, राष्ट्रसेवा हा राष्ट्र विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. आजचा युवक चांगला घडला तर उद्याचा देश समर्थ असेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम भोरे याने, युवराज भुरबुडे याने पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच चंद्रकांत दुधेडा याने आभार प्रदर्शन केले. कांतीलाल लहरे याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com