Sun, May 28, 2023

बोईसरमध्ये शिवजयंती साजरी
बोईसरमध्ये शिवजयंती साजरी
Published on : 20 February 2023, 10:51 am
मनोर, ता. २० (बातमीदार) : बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व शिवसम्राट ऑटोरिक्षा टॅक्सी-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने बोईसरमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसम्राटचे संस्थापक निलम संखे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पुजन केल्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी शिव सम्राट रिक्षा युनियनचे अध्यक्ष अखिलेश सिंह, सचिव प्रवेश सिंग, धणेश संखे, रिक्षा चालक, मालक तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.