Mon, June 5, 2023

ठाण्यात पाककला स्पर्धा उत्साहात
ठाण्यात पाककला स्पर्धा उत्साहात
Published on : 22 February 2023, 10:45 am
ठाणे, ता. २० (बातमीदार) : ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळाकडून दासनवमी उत्सवानिमित्त यंदा प्रथमच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मिस्टर कबाब अँड मिस करी हॉटेलचे निवेदिता प्रधान यांनी केले. या वेळी डॉ. अमृता जगताप यांनी आयुर्वेद आणि ऋतूनुसार आहार कसा असावा याचे मार्गदर्शन ही केले. या स्पर्धेसाठी मुख्य घटक मका ठेवण्यात आले होते. मक्याचे कबाब, थालीपीठ, पुलाव, चाटपासून पिझ्झा, पास्तापर्यंत तर गोड पदार्थांमध्ये शिरा, हलवा, पुडिंग, श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, लाडू आदी पदार्थ बनवण्यात आले होते. या स्पर्धेत वर्षा झापकर प्रथम, मानसी बोऱ्हाडे द्वितीय; तर कल्याणी साळवी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.